Ajit pawar vs Eknath Shinde Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: भुजबळांनी 'बळ' दाखवलं, दादांनी दंड थोपटले; नांदगाववरून राष्ट्रवादी-शिवसेनेत मिठाचा खडा!

Chhagan Bhujbal Vs Dada Bhuse: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुलगा समीर भुजबळ यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवरुन हा नवा कलह पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. ९ ऑक्टोबर

राज्याच्या विधानसभा निवडणुकांआधी मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्येच महाभारत पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामधील वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुलगा समीर भुजबळ यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवरुन हा नवा कलह पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवरुन आता महायुतीत नवा वाद पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या ट्वीटमध्ये त्यांनी नांदगाव मनमाड मतदार संघासाठी दिल्या शुभेच्छा, असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. नांदगाव मनमाड मतदार संघात शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. मात्र छगन भुजबळांच्या ट्वीटमुळे नांदगाव मनमाड मतदार संघात समीर भुजबळांची उमेदवारीसाठी तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

यावरुनच आता शिवसेना शिंदे गटानेही छगन भुजबळांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांच्या ट्विटनंतर दादा भुसे यांनी आम्ही येवल्याची जागा मागितली तर? असा थेट सवाल भुजबळांना केला आहे. तसेच नांदगावची जागा शिवसेनेचीच आहे, असा थेट इशाराही यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नांदगावच्या जागेवरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

रायगडमध्येही महायुतीत घमासान..

रायगड जिल्ह्यातील सातही जागा महायुती म्हणून आम्ही लढवू आणि जिंकून आणु असा पुनरुच्चार शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलाय. महायुती मधील वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं आणि मला थांबा म्हणून सांगितलं तरी माझी थांबायची तयारी आहे. पण उमेदवार कुणीही असो महायुतीच्या सर्व जागा रेकॉर्ड ब्रेक निवडून आणू, महायुतीचा धर्म पाळू आणि आमच्या मित्र पक्षांचीही साथ मिळेल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT