India vs South Africa 3rd ODI: वचपा काढला! विजयी चौकार लगावत टीम इंडियाचा शानदार विजय

India vs South Africa Live Score, 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना विशाखापट्टणम झाला.
India vs South Africa Live Score, 3rd ODI:
Yashasvi Jaiswal celebrates his maiden ODI century as India defeat South Africa in the Vizag series decider.saamtv
Published On

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारतीय संघाने मागील एकदिवसीय सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या २७१ धावांचे आव्हान भारतीय संघाच्या तीन शिलेदारांनी सहज पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांची मालिका जिंकलीय. विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना झाला.

India vs South Africa Live Score, 3rd ODI:
रोहित शर्मानं इतिहास रचला! सचिन तेंडुलकर-विराटच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

या सामन्यात यशस्वी जैस्वालने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलं. जैस्वालने नाबाद राहत १२१ चेंडूत ११६ धावा केल्या. यात १२ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हे यशस्वीचे पहिले एकदिवसीय शतक होतं. तर विराट कोहलीने नाबाद राहत ६५ धावा केल्या. तर रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत ७५ धावा केल्या.

India vs South Africa Live Score, 3rd ODI:
Rohit Sharma: भर मैदानात रोहित शर्माने कोणती मागितली इच्छा? हिटमॅनचा जवळचा मित्र अभिषेक नायरने केला खुलासा

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ने जिंकलीय. यातील पहिला सामना हा रांचीमध्ये झाला होता, त्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसरा सामना रायपूर येथे झाला. या मात्र भारताचा दारूण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्सने विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं पराभवाचा वचपा काढत मालिका खिश्यात घातलीय.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रोहित शर्माने ५४ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने ७५ चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये ३ चौकार आणि १ षटकारचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com