आमदार कांदेंसोबतचा वाद मिटला?: भुजबळांनी दिली 'ही' प्रतिक्रिया Saam Tv
महाराष्ट्र

आमदार कांदेंसोबतचा वाद मिटला?: भुजबळांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

भुजबळ विरुद्ध शिवसेना असा हा संघर्ष अजिबात नाही

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: नाशिकचे Nashik पालक मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार सुहास कांदे MLA Suhas kande यांनी केला होता. त्यानंतर या वादामध्ये अंडरवर्ल्डची एन्ट्री झाली. सुहास कांदे यांनी धमकीच्या फोनचा आरोप केला. त्याची चौकशी करावी, असे छगन भुजबळ यांनी काल पत्रकारांना स्पष्टपणे म्हटले होते. मात्र आता आता हा वाद कुठे थांबणार? असा प्रश्न विचारण्यात आला असता छगन भुजबळ यांनी त्याला आता उत्तर दिले आहे.

हे देखील पहा-

कोणावरही चुकीचे आरोप लावणे आणि कलगीतुरा निर्माण करणे हे थांबले पाहिजे. माझ्या दृष्टीने हा वाद इथेच संपला आहे. त्यावर आता जी काही चर्चा करायची आहे ती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात करू', असे छगन भुजबळ म्हणाले.

तर, नांदगावला 45 कोटी रुपये निधी दिला. यावर्षी फक्त 10 टक्के पैसे आलेत, ते ही केवळ कोरोना नियोजनासाठी. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पत्रावर मी जिल्हाधिकारी यांनी उचित कार्यवाही करावी, असा शेरा देतो. पुढे काय करायचं ते जिल्हाधिकारी आणि समिती ठरवते. मी निधी वाटतो हा कांदे यांचा आरोप चुकीचा आहे. पालकमंत्री म्हणून सर्वांना समान वाटप करणं हे माझं काम आहे. यासाठी हायकोर्टात जाणं योग्य नाही. मुख्यमंत्रीचं आपलं कोर्ट, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला हवं होतं मुख्यमंत्र्यांनी विषय सोडवला असता. महाविकास आघाडीत असे आरोप होणं योग्य नाही.

मी कांदे यांना सहकार्य करणार;

मी कांदे यांना सहकार्य करणार. छगन भुजबळ कुणालाही धमकी देत नाही, विनंती जरूर करतो. माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम. कांदे यांना माझ्याकडून जी काही मदत करता येईल ती करेन. असे आरोप होणं हे दुःखदायक, वेदनादायी. भुजबळ विरुद्ध शिवसेना असा हा संघर्ष अजिबात नाही. असे भुजबळ म्हणाले.

कांदे सेनेचे आमदार म्हणून सेनेचे नेते त्यांच्यासोबत असावे. बाळासाहेबांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबियांनाही राहिला नाही, यांना का? मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते पालकमंत्री बदलतील. झ्या दृष्टीने हा वाद संपला यापुढे जी काय चर्चा करायचीय, मुख्यमंत्र्यांसमोर. घरातलं भांडण चव्हाट्यावर आणायची गरज नाही.

भाजप-मनसे युती;

निवडणुका आल्या की वेगवेगळे पक्ष युती करतात. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार. जनता निर्णय घेईल.

दरम्यान, आमदार सुहास कांदे यांना छगन भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात यावी. या कारणाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या पुतण्याचा फोन आल्याचा आरोप आमदार कांदेंनी केला भुजबळ यांचावर केला होता. आज मात्र त्याबाबत छगन भुजबळ यांनी बोलण्याचं टाळलं आहे. मी आता यावर काहीही बोलणार नाही. कोणाला काहीही सांगत नाही. त्यांना जे करायचं आहे ते करतील, असे ते म्हणाले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT