Chhagan Bhujbal  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: सतत पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधानं, बाळासाहेब आणि शरद पवारांचं उदाहरण देत भुजबळांनी पटोलेंचे कान टोचले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे छगन भुजबळ यांनी त्यांच्या शैलीत कान टोचले आहेत

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत इम्पेरिकल डेटाबाबत मुख्यंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही छगन भुजबळ यांनी त्यांच्या शैलीत कान टोचले आहेत (Chhagan Bhujbal On Nana Patoles Statement About PM Narendra Modi).

नाना पटोले वादावर भुजबळ काय म्हणाले?

नाना पटोले (Nana Patole) हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे असताना इंदिराजी आणि शिवसेना यांच्यात वाद होता. मात्र, इंदिराजींचा अपमान करायचा नाही, असं बाळासाहेबांनी सांगितलं. कारण, त्या पंतप्रधान होत्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमात ते आल्यानंतर शरद पवार उठून उभे राहिले. हा त्या खुर्चीचा मान आहे. बस, मला बाकी काही बोलायचं नाही, अशी राजकारणातील उदाहरणं देत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाना पटोलेंचे कान टोचले आहेत.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना इम्पेरिकल डेटाबाबत माहिती देणार

राज्य सरकारकडे असलेला डेटा एकत्र करून आयोगाच्या अध्यक्षांपुढे मांडला आहे. ट्रिपल टेस्ट पक्की आहे, दोन टेस्ट मान्य केल्या आहेत. आयोग नेमून इंपेरिकल डेटा गोळा करण्याची मागणी देखील मान्य झाली आहे. हा डेटा आयोगापुढे मांडला आहे. आयोगातील काही सदस्यांनी काही कारणांमुळे विरोध केला आहे. त्यामुळे मागच्या तारखेला आम्ही सुप्रीम कोर्टाला हा डेटा सादर केला. डेटा मान्य करावा, अशी मागणी आम्ही सुप्रीम कोर्टाला केली. दोन आठवड्याच्या आत आयोगाने म्हणणं मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या डेटाबाबत माहिती देणार आहेत. काय आपल्याला पाहिजे आणि काय आपल्याकडे आहे याची मांडणी करणार आहे.

सर्दी-ताप असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये - भुजबळ

शाळा (School) सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. कोरोना विद्यार्थी सापडल्यास शाळा बंद करण्यात यावा आशा सूचना आहेत. आई-वडिलांनी देखील सर्दी ताप असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये, असं भुजबळ म्हणाले.

पर्यावरणाकडे लक्ष द्यायला विकासकांना वेळ नाही - भुजबळ

पर्यावरणाचा आपण नाश करतो आहोत. मात्र, पर्यावरणाकडे लक्ष द्यायला विकासकांना वेळ नाही. अजून झाड तोडा म्हणजे विकास होईल. मुंबई सारखी परिस्थिती झालीच तरी ब्रिज तयार करण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था आहेत. शहराचा विकास बैठा करा, गलिच्छ वातावरण, प्रदूषण ही परिस्थिती नाशिक व्हायला नको. कारभाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT