chhagan bhujbal  Saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: नाराज छगन भुजबळ अचानक सागर बंगल्यावर, CM फडणवीसांशी चर्चा, मोठा निर्णय घेणार?

Maharashtra Politics: छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Saam Tv

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचे केंद्र बनले आहेत. खातेवाटपामध्ये संधी न मिळाल्याने भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी मंत्रिपद न दिल्याने त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात दंड थोपटले आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटील पोहोचले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका मांडणार आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर महिन्याभरात मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. महायुतीतील बऱ्याच नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. यातील बऱ्याच नेत्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांचाही समावेश होता.

मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ अत्यंत आक्रमक झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटत नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आपल्याला मंत्रीपद मिळावे याकरीता देवेंद्र फडणवीस आग्रही होते असे भुजबळांनी म्हटले. आता ते फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीमध्ये असताना संधी न मिळाल्याने छगन भुजबळ आता भाजपच्या वाटेला जाणार का अशी चर्चा सुरु झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता भुजबळ आपली बाजू समोर मांडणार आहेत. भेट पूर्ण झाल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये भुजबळ निर्णय सांगू शकतात असेही म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT