Chhagan Bhujbal x
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या मृत्यूची अफवा, हृदयविकारानं निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

Chhagan Bhujbal Death Fake News: सोशल मीडियावर मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची खोटी बातमी प्रसिद्ध केली जात आहे. एका वृत्तवाहिनीचा अधिकृच लोगो वापरुन ही खोटी माहिती पसरवली जात आहे.

Yash Shirke

Chhagan Bhujbal News : मंत्री छगन भुजबळ यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरुन छगन भुजबळ यांचा मृत्यू झाला आहे अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीचा अधिकृत लोगो आणि थमनेल वापरुन छगन भुजबळ यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवली जात आहे. 'छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे' असा व्हिडीओ एका व्यक्तीने यूट्यूबवर शेअर केला होता. त्याने वाहिनीच्या लोगोचा गैरवापर करत चुकीची आणि खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

छगन भुजबळ हे सध्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. २० मे २०२५ रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या ते येवला विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. १९९९-२००३ आणि २००९-२०१० या कालावधीत छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृह विभाग यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी याचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली होती. घनश्यामने स्वत: इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मृत्यूची बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवली जात आहे. सोशल मीडियावर अनेकदा सर्रासपणे अफवा, खोटी माहिती पसरवली जाते. अशा वेळी कोणतीही माहिती फॉरवर्ड करताना, इतर लोकांना पाठवताना त्याची सत्यता तपासून घेणे आवश्यक आहे. आपण फॉरवर्ड करत असलेली माहिती खरी आहे की खोटी हे जाणून न घेतल्याने आपणही खोटी माहिती पसरवत आहोत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT