Chef Vishnu Manohar Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Dosa Record: विष्णू मनोहर यांचा पुन्हा विश्वविक्रम, २४ तासांत ३-४ हजार नाही तर तब्बल १० हजार डोसे केले; पाहा VIDEO

Chef Vishnu Manohar: दिवाळीनिमित्त नागपूरमधील प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांनी २४ तासांत डोसे बनवण्याचा नवा विक्रम केला आहे. विष्णू मनोहर यांनी याआधी देखील अनेक विक्रम खाद्यपदार्थ बनवण्याचे केले आहे.

Priya More

भारतात टॅलेंटची काहीच कमतरता नाही. सेलिब्रिटी असो की फ्रेशर त्यांनी काही करायचे ठरवले तर ते विक्रम करतात. दिवाळीनिमित्त नागपूरमधील प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांनी २४ तासांत डोसे बनवण्याचा नवा विक्रम केला आहे. विष्णू मनोहर यांनी याआधी देखील अनेक विक्रम खाद्यपदार्थ बनवण्याचे केले आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी १ हजार, २ हजार किंवा ३ हजार नाही तर तब्बल १० हजार डोसे बनवण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या उत्साही उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

विष्णू मनोहर यांनी रविवारी सकाळी ७ वाजता पासून डोसे बनवण्यास सुरूवात केली आणि आज सकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी डोसे बनवण्याचा विक्रम केला. जवळपास १० हजारांच्यावर डोसे त्यांनी बनविले. या डोशांचा आस्वाद घेण्यासाठी नागपुरकरांनी मोठी गर्दी केली होती. जवळपास ३०० किलोपेक्षा जास्त डोशाच्या बॅटरपासून त्यांनी १० हजार डोसे तयार केले..

शेफ विष्णू मनोहर यांच्याबद्दल सांगावे ते कमीच आहे. त्यांना प्राऊड ऑफ नागपूर म्हणतात. त्याच्या टॅलेंटला परिचयाची गरज नाही आणि त्याची आवड नुसती बघूनच लक्षात येते. त्याच्या हातांनी बनवलेल्या वस्तूंच्या चवीबद्दल काय बोलावे लोक नुसती बोटं चाटत राहतात. त्याने आतापर्यंत २५ विश्वविक्रम केले आहेत. डोसा चॅलेंजपूर्वी त्यांनी अयोध्येत ७००० किलो 'राम हलवा' शिजवला होता. त्यांनी सर्वात मोठा शाकाहारी कबाब तसेच देशातील सर्वात मोठा पराठा बनवला आहे.

डोसा चँलेंजमध्ये त्यांनी पहिल्या ९ तासांत तब्बल ६,७५० डोसे तयार केले. त्याची जादू पाहण्यासाठी हजारो नागपुरकर आले होते. नागपूरच्या बजाजनगर येथे विष्णुजी की रसोई येथे त्यांनी डोसे बनवण्याचा विक्रम केला. विष्णू प्रभाकर यांनी ८ तव्यासह ३ शेगड्या वापरल्या. याठिकाणी विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या १० हजार डोशांसोबत नागरिकांनी चटणी आणि सांबारवर ताव मारला. डोसे खाण्यासाठी मोफत प्रवेशामुळे मोठी गर्दी झाली होती. डोसा 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर वितरित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान २४ तास नॉन स्टॉप मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हिंदी आणि मराठी गाणी वाजत राहिली. गझल, भजन आणि स्टँड-अप कॉमेडी देखील झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी पात्र ठरलेल्या टीम्स कोणत्या? पाहा 20 टीम्सची संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

दिवाळीसाठी शॉपिंग करून घराकडे येताना भयंकर अपघात, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याने सोडले प्राण

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT