Hingoli: काँग्रेस नगरसेवकाविरोधात खोटा गुन्हा दाखल; आमदार प्रज्ञा सातव यांचा मध्यरात्री पोलीस ठाण्यात ठिय्या! संदीप नागरे
महाराष्ट्र

Hingoli: काँग्रेस नगरसेवकाविरोधात खोटा गुन्हा दाखल; आमदार प्रज्ञा सातव यांचा मध्यरात्री पोलीस ठाण्यात ठिय्या!

हिंगोलीत काँग्रेसच्या नेत्या व विधानपरिषेदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी मध्यरात्री कळमनुरी पोलीस स्थानकात तासभर ठिय्या मांडला

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: हिंगोलीत काँग्रेसच्या नेत्या व विधानपरिषेदेच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी मध्यरात्री कळमनुरी (Kalamanuri) पोलीस (Police) स्थानकात तासभर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी (Police) किरकोळ भांडणाच्या प्रकरणात काँग्रेस (Congress) नगरसेवकाच्या (corporator) विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक केल्याने प्रज्ञा सातव कळमनुरी पोलिसानं विरोधात संतापले होते. हिंगोली (Hingoli) जिल्हा पोलीस स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप (Allegations) त्यांनी यावेळी केला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान कळमनुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत तातडीने काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांच्या विरोधात दाखल केलेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा मागे घ्यावे. आणि राजकीय (Political) दबावास बळी पडून काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास देणे थांबवावे. अन्यथा आपण या विरोधात विधान भवनात (Vidhan Bhavan) आवाज उठवणार असल्याचे प्रज्ञा सातव यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान महिला लोकप्रतिनिधी मध्यरात्री पोलीस स्थानकात आल्याचे समजताच, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस स्थानकात दाखल होत प्रज्ञा सातव यांचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणात योग्य तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. या प्रकाराने हिंगोली जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT