Wedding Dispute saam tv
महाराष्ट्र

Wedding Dispute: लग्नमंडप की कुस्तीचा आखाडा? “आमच्या लोकांना जेवण का नाही?” प्रश्न विचारताच पाहुण्यांमध्ये जोरदार हाणामारी

तिरपोळे गावातील लग्नसोहळ्यात जेवण वाढण्यावरून झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लग्न म्हटलं की गाणी, हसणं-खेळणं आणि जेवणाच्या पंगती हे सगळं आलंच...पण कधी कधी या अशी काही गोष्ट घडते ज्यामुळे लग्नाचं सगळं चित्रच बदलून जातं. असाच काहीसा प्रकार तिरपोळे गावात झालेल्या एका लग्न सोहळ्यात घडला आणि आनंदाचा माहोल क्षणात तणावात बदलला.

जेवण वाढण्यावरून झाला गोंधळ

तिरपोळे गावात मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा सुरू होता. मंडपात नातेवाईक, गावकरी आणि पाहुण्यांची गर्दी होती. जेवणावळीची व्यवस्था सुरू असताना काही पाहुण्यांनी “आमच्या लोकांना जेवण का वाढत नाही?” असा सवाल उपस्थित केला. हा साधा प्रश्न होता, पण त्यावरूनच वादाला ठिणगी पडली.

सुरुवातीला हा वाद फक्त बाचाबाचीपुरता मर्यादित राहील असं वाटत होतं. पण काही क्षणांतच दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांसमोर उभे ठाकले आणि तिखट शब्दांची देवाणघेवाण थेट शिवीगाळीपर्यंत पोहोचली. लग्नमंडपातच एकच गोंधळ उडाला आणि पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली.

वादाचं रूपांतर थेट हाणामारीपर्यंत

या वादाचे रूपांतर अचानक हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हात उचलल्याने लग्नसोहळ्याचा आनंद क्षणात नाहीसा झाला. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार करण्यात आला. तो व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीये. उपस्थितांनी मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. अखेर या घटनेनंतर मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही तक्रार सरदार झबुलाल ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेला हा प्रकार गावात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT