Amravati , Naiem Khan Case, Youth , Chandur Railway Police, Chandur Railway Saam Tv
महाराष्ट्र

Chandur Railway : मुलीला पळवून नेणा-या नईम खान खून प्रकरणी चाैघे अटकेत

नईम खान याचा खून झाल्याने त्याची चांदूर रेल्वे शहरातील दहशत संपली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati : अमरावती (amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील गुंड नईम खान याच्या खून प्रकरणी चांदूर रेल्वे पाेलीसांनी चाैघांना अटक केली आहे. या सर्व संशयित आराेपींवर खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. दरम्यान चांदूर रेल्वे येथील नईम खानची दहशत संपल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास साेडला आहे. (amravati latest marathi news)

चांदूर रेल्वे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाेलीस ठाण्याला घेराव घातला हाेता. यावेळी नागरिकांनी मुलीचा तातडीने शाेध घेऊन तिची सुटका करावी. तसेच नईम खानला अटक करा अशी मागणी केली हाेती. पाेलीसांनी नागरिकांना आश्वासित करुन तपास सुरु केला हाेता.

दरम्यान नईम खाननं संबंधित मुलीला घरी नेऊन सोडले. त्याच रात्री खान याचा खून झाला. त्याची बातमी संपुर्ण शहरासह अमरावती जिल्ह्यात पसरली. खानचा खून झाल्याने त्याची परिसरातील दहशत संपली हाेती पण त्याचा कुणी गेम केला याची चर्चा दबक्या आवाजात सुरु हाेती.

पाेलीसांनी या प्रकरणाचा तपास करुन खान याच्या खून प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले. चाैकशी अंती त्यांना अटक केली. यामध्ये मो. आशिक, अफजल खा, साजीद उमर उर्फ पप्पू व दिपक पवार यांचा समावेश आहे. या सर्वांवर खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : पवारांचा गड भेदला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश; साखर पट्ट्यात 'तुतारी'ची पिछेहाट

Maharashtra News Live Updates: बच्चू कडूंचं ईव्हीएम विरोधातील तूर्तास आंदोलन मागे

Sweet Potato: रताळ्यापासून बनवा असे स्वादिष्ट पदार्थ

Maharashtra CM : महायुतीचं संभाव्य मंत्रिमंडळ, कुणाला मिळणार संधी, कोण स्पर्धेत?

Yoga Tips: गृहिणीसाठी फिटनेस उपयुक्त योगा टिप्स

SCROLL FOR NEXT