chandrakant patil
chandrakant patil Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे - चंद्रकांत पाटील

संभाजी थोरात

कोल्हापूर - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) म्हणले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले पुढे म्हणले की, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी त्यांची तब्येत बरी व्हावी ही आमची इच्छा आहे. मात्र राज्यात इतके प्रश्न आहेत की मुख्यमंत्र्याचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची गरज आहे. तो कोणाकडेही द्या आमचं काही म्हणणं नाही असे देखील ते म्हणले.

हे देखील पहा -

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझ्या आणि पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. पक्षाचे वरिष्ठ काळजी करायला समर्थ आहेत. मुंबई बँकेत मुंबई बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळाले. राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे अशी खळबळजनक टीका पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मतं लागतात याची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. पण शिवसेनाअसे प्रयत्न का करत आहेत हे कळत नाही. संजय राऊत यांचं गोव्यात जे काही चाललंय ते भाजपच्या फायद्याचं असल्याचं देखील ते म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT