Chandrasekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News: चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली जाहीर माफी; काय आहे प्रकरण?

या बॅनरमुळे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrashekhar Bawankule News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. जगभरात मोठ्या उत्साहात बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक नेते शुभेच्छा देत असतात. मात्र, नागपूर जिल्ह्यातील असाच एक जयंतीच्या शुभेच्छा देणारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बॅनर वादग्रस्त ठरला आहे.

या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा बावनकुळेंचा मोठा फोटो असल्याचे दिसत आहे. या बॅनरमुळे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे. (Latest Marathi News)

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बॅनरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे .' हा काय घाणेरडा प्रकार आहे. बावनकुळे साहेब, तु्म्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात. हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल आव्हाड यांनी केला होता.

या बॅनरवरून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . 'या बॅनरमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची माफी मागतो. असा फोटो लावणे मान्यच नाही. ती कार्यकर्त्याने चूक केली असून ते बॅनर तातडीने काढण्यात आलं आहे. संबंधित कार्यकर्त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. मात्र, हा प्रकार माफी योग्य नाही. त्या कार्यकर्त्याला पक्षातून काढणार असून कारवाई करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाने दिले स्पष्टीकरण

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी श्री हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेथील रहिवासी मेघराज बेलेकर यांच्या घरावर फ्लेक्स बॅनर लावले होते. हे बॅनर समाजमाध्यमावर व्हायरल झाले.

हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. सोबतच बॅनरवर नावे लिहून प्रसिद्धीचा प्रयत्न करणाऱ्या पाच व्यक्तींनी जाहीर माफीनामा लिहिली आहे. ही चूक आमच्याकडून झालेली आहे याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला आहे. या प्रकरणाशी भाजपा व भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोणताही संबंध नाही हे घटनाक्रमावरून लक्षात येते.

चूक लक्षात आली तशी त्या कार्यकर्त्यांनी लेखी माफी मागितली व तसे माफीचे बोर्डही लावले. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. आपण विकासाचे काम करू या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यलयाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

SCROLL FOR NEXT