Sanjay Raut  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News: संजय राऊतांनी सकाळचा भोगा बंद करावा; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

संजय राऊतांच्या टीकेला आता बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Chandrashekhar Bawankule News: ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण झाल्यानंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष चिघळला आहे.

ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी 'जीभ चुरू चुरू चालतेय, टांगा सांभाळा, असं म्हणत बावनकुळे यांना इशारा दिला होता. संजय राऊतांच्या टीकेला आता बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, 'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सर्वात जास्त लाड पुरवले. तुम्हाला त्यांनी भावा सारखे मानले, आता तुम्ही त्यांच्यावर बोलता. कार्यकर्त्यांची देखील कामे बाजूला ठेवून उद्धव ठाकरे, तुमची कामे देवेंद्र फडणवीस यांनी केली'.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांनी सकाळचा भोगा बंद करावा. सकाळचा भोगा बंद झाला तर राजकीय वातावरण खराब होणार नाही. सकाळचा भोगा बंद झाला तर राजकीय वातावरण खराब होणार नाही. विरोधकांनी विकासाचा अजेंडा घेऊन या'.

'जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यसाठी काम केले पाहिजे. महाराष्ट्र राजकीय ,सांस्कृतिक वातावरण बिघडू नका. उद्धव ठाकरे यांचे 5 वर्ष लाड पूर्ण केले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील बाजूला ठेवले होते. ज्यांनी भावसारखे वागणूक दिली, त्याच्या विरोधात असे बोलत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tan Removing Tips: पावसाळ्यात त्वचा चिकट अन् काळी पडलीये? टॅनिंग दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Malegaon Bomb Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर निकाल; सर्व आरोपी निर्दोष, इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया|VIDEO

Bhandara District Bank Election : भंडारा जिल्हा बँकेवर महायुतीची एकहाती सत्ता; थांबविलेले सहा निकालही जाहीर

Pune Hotel : बिल जास्त आकारल्याने तरुणांची सटकली, हॉटेलच्या कामगाराला अमानुष मारहाण, गावातून धिंड काढत...; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची नांदेड पोलिसांनी काढली धिंड

SCROLL FOR NEXT