Chandrasekhar Bawankule announced Names 70 new district presidents of BJP Maharashtra politics Saam TV
महाराष्ट्र

BJP Maharashtra: भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल; चंद्रशेखर बावनकुळेंकडून जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित

Maharashtra BJP New District President List: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra BJP New District President List: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि भाजपने मोठी तयारी सुरू केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्लीत एनडीएची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातील नेत्यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान, याबैठकीनंतर महाराष्ट्रात भाजपने मोठे फेरबदल केले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत नावांची आणि पदांची माहिती दिली आहे.

बावनकुळेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय?

'भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे', असं ट्विट चंद्रशेख बावनकुळे यांनी केलं आहे.

'मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे', असंही बावनकुळे म्हणाले.

'पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे', असंही चंद्रशेख बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT