Chandrapur News SaamTv
महाराष्ट्र

Chandrapur News: कर्णकर्कश्श हॉर्न लावणाऱ्या बुलेट राजांना घडवली अद्दल; RTOने ठोठावला हजारोंचा दंड

हौशी बुलेटराजांवर चंद्रपूर आरटीओने मोठी कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandrapur News: सध्या तरुणाईमध्ये बुलेट गाडीला कर्णकर्कश हॉर्न लावण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. तरुणांमध्ये कर्कश दुचाकी वाहनांचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

अनेक तरुण बुलेटला मॉडीफाय करण्याच्या नादात वाहनात छेडछाड करून वेगवेगळे बदल करतात. अशा हॉर्नमुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशाच हौशी बुलेटराजांवर चंद्रपूर आरटीओने मोठी कारवाई केली आहे. (Chandrapur News)

याबाबत माहिती अशी की, चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गाडीला मोठे हॉर्न लावणाऱ्या तरुणांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेंसर, मॉडीफाय केलेले नंबरप्लेट काढण्यात आले आहेत.

दोन दिवसांत पाच बुलेटराजांवर कारवाई करत प्रत्येकी १२ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. त्यामुळे बुलेटराजांचे धाबे दणाणले आहेत.

अनेकजण सायलेंसर बदलून मोठा आवाज येणारा तसेच फटाक्यांसारखा आवाज येणारा सायलेंसर बसवून गर्दीच्या ठिकाणी वाजवत असतात. यामुळे ज्येष्ठांना अडचणींचा सामना करावा लागतो.

याबाबत अनेकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे  तक्रारी दिल्या होत्या. ही बाब गांभीर्याने घेत विशेष पथक करत कारवाई सुरू केली. दरम्यान, दोन दिवसांपासून त्यांनी पथक तैनात केले आहे. या कारवाईचा अशा बुलेटराजांनी चांगलाच धसका घेतला आहे. (RTO)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध बिल्डरची गोळ्या झाडून हत्या केली अन् विरारमधून पळाला, कुख्यात गँगस्टरला उत्तर प्रदेशातून अटक

MNS- Shivsena: मुहूर्त ठरला! १८ डिसेंबरला होणार मनसे-शिवसेना युतीची घोषणा? राज ठाकरे- संजय राऊत यांच्यात काय चर्चा झाली?

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीला बावधन दोन पोलिसांनी येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

...तोपर्यंत पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार नाही, शिंदेंच्या शिलेदाराची खरमरीत टीका, सायकल चालवण्याचा दिला सल्ला

Top 5 Maruti Cars: उत्तम मायलेज अन् भन्नाट फिचर्स; 10 लाखाच्या आत मिळतील या Top 5 मारुती कार्स

SCROLL FOR NEXT