Shaguna Zade, Panjali Meshram Accident
Shaguna Zade, Panjali Meshram Accident Saam Tv
महाराष्ट्र

दुदैवी! पदवी परीक्षेसाठी निघालेल्या दोन तरुणींचा अपघातात मृत्यू

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : पदवी परीक्षा देण्यास निघालेल्या दोन तरुणींचा अपघातात मृत्यू झाला. ही दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आर्वी ते खामोना मार्गावर घडली. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. शगुणा झाडे आणि प्रांजली मेश्राम अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणींची नावे आहेत. (Chandrapur Bike Accident Two Students Death)

मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर जवळील निंबाळा येथील शगुणा झाडे व प्रांजली मेश्राम या दोघी मैत्रिणी स्कुटीने राजुरा येथील एका महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाचा पेपर देण्यासाठी येत होते. मार्गातील आर्वी ते खामोनादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक बसली.

धडक बसताच दोघीही रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याना चिरडले. या घटनेत दोन्हीही जीवलग मैत्रिणींचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील अन्य युवक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडल्याने तो थोडक्यात बचावला. परंतु सदरील तरुणही गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुण राजुराजवळील चुनाळा येथील असल्याचे समजते.

दरम्यान, सदरील अपघाताची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. दोन्ही जिवलग मैत्रिणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT