Chandrapur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Accident News: वळणावर ट्रॅक्‍टर अनियंत्रीत; ट्राॅली पलटून झालेल्‍या अपघातात २ ठार

वळणावर ट्रॅक्‍टर अनियंत्रीत; ट्राॅली पलटून झालेल्‍या अपघातात २ ठार

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंटचे खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. या अपघातात (Accident) २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मूल तालुक्यातील पिपरी-दीक्षित येथे घडली. (Breaking Marathi News)

केळझर येथून (Chandrapur) चिंचाळा येथे सिमेंट खांब नेत असताना पिपरी- दीक्षित येथील वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. वळण असल्‍याने चालकाला नियंत्रण मिळविणे शक्‍य झाले नाही. यामुळे ट्रॅक्‍टरची ट्राॅली उलटी झाली. ट्राॅलीमध्‍ये असलेले सिमेंट खांब अंगावर पडून २ जण जागीच दगावले. 

जखमींवर उपचार सुरू

ट्रॅक्‍टरच्‍या ट्राॅलीतील सिमेंटचे खांब अंगावर पडल्‍याने मिथुन मराठे (वय ३५) आणि अंकित गंडेशिवार (वय ३०) यांचा मृत्‍यू झाला. तर अन्‍य दोन जण गंभर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्‍णालयात दाखल केले आहे. मृतक आणि जखमी हे सर्व मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कांदिवली लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

Dhurandhar 2 : २० दिवसांनंतरही दीपिका पादुकोण गप्प का? रणवीर सिंहच्या 'धुरंधर'वरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

IPL Points Table: MIचा दरारा गायब, राजस्थानच्या विजयानं पॉईट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर; कोणत्या संघाला किती मिळाले पॉईट्स?

Pod Taxi Update: 40 kmph स्पीड, 6 सीटर, चालवायला ड्रायव्हरही नसणार; मुंबईत धावणार भारतातली पहिली पॉड टॅक्सी

ST Ticket Hike: 'लालपरी'चा प्रवास महागला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT