Dombivili News: बाहेरून टाळे ठाेकून घरातच लपला; सहा महिन्यांपासून पसार सोनार पोलिसांच्‍या ताब्‍यात

बाहेरून टाळे ठाेकून घरातच लपला; सहा महिन्यांपासून पसार सोनार पोलिसांच्‍या ताब्‍यात
Dombivili News
Dombivili NewsSaam tv

अभिजीत देशमुख

डोंबिवली : सर्व सामान्य नागरीकांकडून भिसीच्या नावाने दागिने आणि पैसे घेऊन पसार झालेल्या सोनाराला (Dombivili) डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यापासून सोहनसिंग दसाना नावाचा हा भामटा सोनार घरातील एका रुममध्ये बाहेरुन टाळे ठोकून लपून राहत होता. पत्नी आणि मुलगी व्यतिरिक्त कोणालाही याची माहिती नव्हती. पोलिस (Police) घरात दाखल झाले असता कुलूप तोडून त्याला बाहेर काढले. आत्तापर्यंत त्याने मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. (Maharashtra News)

Dombivili News
Jalgaon News: आनंदी घरात अवघ्या क्षणात शोककळा; नाचताना भोवळ आली अन्‌..

डोंबिवलीतील ठाकूर्ली रेल्वे स्टेशनसमोर महालक्ष्मी सोनाराचे दुकान होते. सोहन सिंग दसाना नावाचा हा सोनार भिसी लावण्याचे काम करीत होता. मोठ्या प्रमाणात दागिने आणि पैसे लोकांकडून घेतले होते. सहा महिन्यांपूर्वी अचानक त्याचे दुकान बंद झाले. जेव्हा गुंतवणूकदारांनी फोन करण्यास सुरुवात केली. त्याने फाेन बंद ठेवला होता. गुंतवणूक दारांना लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Dombivili News
Amalner News: गळफास घेत शेतकऱ्याने संपविले जीवन

गावी पोहचून पथकाने घेतले ताब्‍यात

कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर, पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिस पथक राजस्थान येथील थुरावड बकगडा भागल गावात पोहचले. सोहन सिंगच्या पत्नीने सांगितले की, ते सहा महिन्यांपासून आमच्या संपर्कात नाही. परंतु पोलिसांना पक्की माहिती होती, की तो घरात बाहेरुन कुलुप लावून राहतो. पोलिसांनी कुलुपू तोडून त्याला बाहेर काढले. त्याला ताब्यात घेऊन त्याला रामनगर पोलिस ठाण्यात आणले. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com