chandrapur crime news
chandrapur crime news  saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : सावधान! वाढदिवस साजरा करताय ? स्पार्कल मेणबत्तीचा स्फोट होऊन मुलगा गंभीर जखमी

संजय तुमराम

चंद्रपूर : वाढदिवसाचा (Birthday) कार्यक्रम म्हणजे आप्तस्वकीय एकत्र येणे, केक कापणे, भेटवस्तूंची देवाण-घेवाण आणि सोबत असते स्पार्कल मेणबत्ती. या झगमगत्या स्पार्कल मेणबत्तीमुळे घातक स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे .चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या भिसी या छोट्या गावात हा मोठा अपघात घडला आहे. आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा यात गंभीर जखमी झाला आहे. (Chandrapur Crime News)

भिसी या छोट्या गावात राहणारे विनोद , वैशाली व  दहा वर्षीय आरंभ हे त्रिकोणी डोंगरे कुटुंब. तिघेही गावातच आपल्या मित्राकडे असलेल्या एका वाढदिवसानिमित्त जातात. वाढदिवसाला सुरुवात होते. केक कापला जातो, भेटवस्तूंची देवाण-घेवाण होते. आणि सोबतीला स्पार्कल मेणबत्तीचा झगमगता प्रकाश दीपवून टाकतो. हास्यविनोदात जेवणं होतात. मुलं आसपास खेळत असताना आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा स्पार्कल मेणबत्तीशी चाळा करत असतो. तेवढ्यात होतो मोठा स्फोट. या स्फोटानंतर अचानक आनंदाचा प्रसंग दुःखात परिवर्तित होतो.

आरंभचा उजवा गाल आणि जीभ फाटते आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेत 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्था रुग्णालयात हलविले जाते. रक्तस्त्राव अधिक झाला असल्याने व वय कमी असल्याने प्रसंग बाका असतो. मात्र प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने 5 तास शस्त्रक्रिया चालते. त्यानंतर आरंभला दीडशे टाके लावल्यानंतर गाल- जीभ जुळवली जाते. आपल्या सर्वांच्या घरांमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्पार्कल मेणबत्ती सर्रास वापरली जाते. मात्र ती किती घातक आहे हे या प्रसंगाने पुढे आणले.

या वाढदिवस कार्यक्रमात एकदा ही स्पार्कल मेणबत्ती पेटविली गेली. त्यातून स्पार्कल बाहेर पडले आणि स्फोट तब्बल 4 तासांनी झाला. ही यातील धक्कादायक बाब आहे. जखमी झाल्यावर आरंभचे फाटलेले गाल व जिभेला पडलेल्या जखमा अशा अवस्थेत क्षण न क्षण महत्त्वाचा होता. योग्य वेळी उपचार मिळाल्याने आस्था रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरंभचा उपचार शक्य केला. मात्र अशा आनंदी प्रसंगात मुलांच्या हाती अशी स्फोटकसदृश्य वस्तू देताना सावधानता बाळगा,असे आवाहन डॉक्टरांनी केले. दरम्यान, एक स्पार्कल मेणबत्ती किती घातक-स्फोटक ठरू शकते याची चुणूक या प्रसंगाने मिळाली आहे. यामुळे समस्त पालकवर्गाने या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

SCROLL FOR NEXT