Income Tax Saam tv
महाराष्ट्र

Income Tax Notice : १० हजार रुपये महिन्याने दुकानात काम, आयकर विभागाची कामगाराला १५ कोटींची नोटीस

Chandrapur News : दिवाकर याचे पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक कागदपत्र हरवले आहे. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार देखील दिली आहे. मात्र गावात काम नसल्याने दिवाकर या गुजरातच्या भावनगर येथे कामाच्या शोधात गेला

संजय तुमराम

चंद्रपूर : डॉमिनोजमध्ये काम करून महिन्याला दहा हजार रुपयांपर्यंत कमावणाऱ्या एका सामान्य घरातील युवकाला आयकर विभागाची तब्बल १५ कोटी ४८ लाख रुपयांची नोटीस आली आहे. विशेष म्हणजे या युवकाच्या नावावर कंपनी असल्याचे देखील त्याला आयकर विभागात गेल्यानंतर समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे युवकाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात धाबा गावातील दिवाकर कुकुडकर या युवकाला आयकराची नोटीस आली आहे. दरम्यान दिवाकर याचे पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक कागदपत्र हरवले आहे. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार देखील दिली आहे. मात्र गावात काम नसल्याने दिवाकर या गुजरातच्या भावनगर येथे कामाच्या शोधात गेला. तिथे त्याने KFC, PIZZA HUT यासारख्या शोरुममध्ये काम केले. 

वर्षभरापूर्वी आला यवतमाळमध्ये 

दोन- तीन वर्ष भावनगर येथे काम केल्यानंतर मागील वर्षी तो यवतमाळ इथे आला. याठिकाणी डॉमिनोजच्या शॉपमध्ये काम करू लागला. सगळे सुरळीत असताना मार्च महिन्यात त्याला आयकर विभागाची १५ कोटी ४८ लाख रुपयांची नोटीस मिळाली. हि नोटीस पाहून सुरवातीला त्याला काही सुचलेच नाही. जाणकारांकडून माहिती घेतली असता त्याच्या पायाखालची वाळू सरकली. याबाबत आयकर विभागात जाऊन वास्तविकता सांगितली. पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही. 

नावावर ट्रेडिंग कंपनी 

दरम्यान येथून घेतलेल्या माहितीत दिवाकरच्या नावावर शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी दाखवण्यात आली असून GST नोंदणी पण करण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे चक्रावून गेलेल्या दिवाकरने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे. यावर आता काय निर्णय होतो, आयकर विभाग काय भूमिका घेते आणि खरेच दिवाकरच्या नावावर कंपनी आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे बाकी आहेत. परंतु निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिवाकरला श्रम, पैसे आणि वेळ वाया घालवावा लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT