Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News: पीएचडीधारकाने मागितली लाखाची खंडणी; पोलिसांनी केली गुन्ह्यात अटकेत

पीएचडीधारकाने मागितली लाखाची खंडणी; पोलिसांनी केली गुन्ह्यात अटकेत

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एका वैध वाळूघाट चालकाला सामाजिक कार्यकर्ता असलेल्या (Chandrapur) पीएचडी प्राप्त व्यक्तीने धमकावत पैशाची मागणी केली. परंतु या मागणीला भीक न घालता त्याने थेट पोलिसात धाव घेत त्याचे बिंग फोडले. (Live Marathi News)

चंद्रपूर जिल्‍ह्यातील २९ वर्षीय शुभम चांभारे मागील ४ ते ५ वर्षांपासून वाळूचा अधिकृत व्यवसाय करीत आहेत. परंतु त्याला लुटण्याचा प्रयत्न एका पीएचड प्राप्त डॉक्टरने सुरू केला. सतत काही ना काही कारणावरून बड्या अधिकाऱ्यांची धमकी देत तो वारंवार फोन करत असे. भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिठ भद्रावती येथील वाळू घाटावर जात फोटो काढत धमकवण्याचे प्रकार सुरू केले होते. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वाळू चालकाने पोलिसांकडे मदत मागितली.

डॉ. दाते हा महिन्याभरापासून चांभारे यांच्या वाळू घाटावर जात त्यांना पैश्यासाठी त्रास देत होता. अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याचे सांगून वाळूवरील कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी  लाख रुपये द्यावे लागतील अशी बतावणी करत होता. या सर्व प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस (Police) स्टेशनमध्ये करण्यात आली. वरोरा पोलिसांनी कलम ३८५ अन्वये डॉ. नरेंद्र दाते याच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT