Chandrapur News Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur News: MBBS तरुणीची आत्महत्या! पहिल्यांदा वाचली, पुन्हा खोल पाण्यात उडी घेऊन आयुष्य संपवलं; लोक VIDEO काढत राहिले

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर, ता. १८ जुलै २०२४

एमबीबीएसची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. पहिल्यांदा वाचल्यानंतर पुन्हा वैनगंगा नदीच्या खोल पाण्यात उडी घेऊन या तरुणीने आयुष्य संपवलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील 'एमबीबीएस' पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ईशा घनश्याम बिजवे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली. पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, ईशा घनश्याम बिजवे ही ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. तिने नदीच्या पुलावरून उडी घेतली. पहिल्यांदा नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र, आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. यावेळी पाणी खोल असल्याने ती पुन्हा वर आलीच नाही.

नदीच्या पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन- चालकांनी मृत्यूचा थरारक व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला मात्र, तिला वाचवण्यासाठी कुणीही धावले नाही. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला.

दरम्यान, उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT