Maharashtra NCP Crisis Anil Deshmukh Ajit Pawar  Saamtv
महाराष्ट्र

NCP Crisis: 'मागेल ते मंत्रीपद देत होते, सतत फोन केले, पण...' अजित पवारांच्या दाव्यानंतर अनिल देशमुखांचा नवा खुलासा

संजय तुमराम

Anil Deshmukh News:

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये सुरू आहे. या दोन दिवसीय शिबिरातून अजित पवार गटाने आगामी काळात पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला. अजित पवारांच्या या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

"शिंदे- फडणवीस सरकारसोबत जाण्यासाठी झालेल्या सर्व बैठकांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) उपस्थित होते. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी माघार घेतली," असा मोठा दावा अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केला होता. तसेच भाजपला मंत्रीपदी अनिल देशमुख नको होते.. असेही अजित पवार म्हणाले. त्यांच्या या दाव्यावर अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

अनिल देशमुखांनी दावा फेटाळला..

"मी मागेल ते मंत्रिपद द्यायला दादा तयार होते. पण मी स्पष्ट नकार दिला. 83 वर्षांच्या बापाला सोडून जाणे हे योग्य वाटले नाही. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटात जाण्यास मी स्पष्ट नकार दिला. मला प्रफुल्ल पटेल यांचे सतत फोन येत होते. पक्षाच्या जितक्या बैठका झाल्या, त्यात भाजप सोबत जायचे नाही, हीच भूमिका मी मांडली," असे अनिल देशमुख म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, कर्जतमधील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट निशाणा साधला.  "२ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नाही तर १५ जुलैला बोलवलं कशाला? आधी मंत्री या मग आमदार या असे सांगितले. निर्णय आवडला नाही तर बोलावले कशाला? मी फसवणूक म्हणणार नाही, पण गाफील का ठेवता?" असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT