Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाला विरोध; चंद्रपुरात आदिवासीचा महाआक्रोश मोर्चा

संजय तुमराम

चंद्रपूर : धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले. यानंतर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या विचाराधीन सरकार आहे. याला आदिवासी समाजाचा विरोध असून यासाठी आज चंद्रपुरात आदिवासी समाजाच्यावतीने महाआक्रोश मोर्चा काढत अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली. यात सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले. 

धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये; या प्रमुख मागणीसह अन्य १३ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी १५ सप्टेंबरला धनगर समाजाच्या शिष्टमंडळास धनगर व धनगड या दोन जाती एकच असून त्यांना जात व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या सुचीत धनगराचा कुठेही उल्लेख नाही. धनगर समाजाला आधीच एनटी ब मध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे. 

शिवाय एका याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला धनगर व धनगड या दोन जाती एक नाहीत, असा निर्णय दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील फेटाळले. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे चुकीचे असल्याचे आदिवासी नेते- कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'दिवाळी', खात्यात येणार 4500 रुपये; बँकेने दंडासाठी कापलेले पैसेही पुन्हा मिळणार

Election Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाची सत्ता येणार? कधी आणि कुठं पाहणार निकाल? वाचा

Marathi News Live Updates : कांदिवलीकरांची वाहतूक कोंडी पासून होणार सुटका

Irani Cup: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघावर पैशांचा वर्षाव! MCA कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT