Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Chandrapur News : शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली. एकावेळेस अनेक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रम शाळेतील काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. रक्ताच्या उलट्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात नऊ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जांभुळ घाट येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेतील एकूण ५३८ विद्यार्थ्यांपैकी २६७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीने केला आहे. यातील नऊ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

मुलांना रक्ताच्या उलट्या

शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती ११ ऑगस्टला अचानक बिघडली. यात मुलींना रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. यानंतर आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली. एकावेळेस अनेक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.

त्रास कशामुळे याचा शोध सुरू

उपचार घेत असलेले विद्यार्थी वेदीका चौधरी (वर्ग ४), राजेश नानाजी राजनहिरे (वर्ग ७), ऋतुजा आशीष चौधरी (वर्ग १०), चांदणी इंदरशहा सिडाम (वर्ग ९), स्नेहा नरेंद्र गायकवाड (वर्ग ७), मोनाली अनिल धुर्वे (वर्ग ७), शर्वरी केशव दोडके (वर्ग १०), शिवाणी अंकोष चौधरी (वर्ग ८), अंजली उमेश फरंदे (वर्ग ४) यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला, याचा शोध घेतला जात असून, त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT