Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra CM : मुख्यमंत्र्यांचे २ विभाग भिडले, महावितरणने पोलीस स्टेशनची वीज कापली, पोलीस अधिकाऱ्याने महावितरण अधिकाऱ्यांचे चलान कापले

Chandrapur : चंद्रपुरात मुख्यमंत्र्यांचे दोन विभाग भिडले आपापसात भिडल्याचे समोर आले आहे. थकीत बिलापोटी महावितरणने पोलिसांची वीज कापली, त्यानंतर पोलीस विभागाने महावितरण अधिकाऱ्यांचे चलान कापल्याचे समोर आले.

Namdeo Kumbhar

संजय तुमराम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा आणि गृह या दोन महत्त्वाच्या खात्यात कशी जुंपली आहे, याचा प्रत्यय चंद्रपुरात आला. महावितरणने केलेल्या कारवाईमुळे दुखावलेल्या पोलिस विभागाने वचपा काढण्यासाठी महावितरण कार्यालयापुढे ठाण मांडले आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांनाच लक्ष्य केले. त्याचे झाले असे की, चंद्रपुरात महावितरणने पोलिस विभागाला 139 कनेक्शन्स दिले आहेत. या वीज कनेक्शनपोटी 81 लाखांचे वीज बिल थकीत आहे.

मार्च महिन्यात थकीत पूर्ण भरायची असल्याने महावितरणने रेटा लावला होता. मात्र तरीही बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील गिरनार चौकातील पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे कनेक्शन महावितरणने कापले आणि यावरूनच दोन विभागातील भांडणाला सुरुवात झाली. अगदी नळावर भांडण व्हावे तसेच पोलिसांनी सूड उगवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे एक भले मोठे पथक महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले. आणि बाहेर निघणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या- वाहने चालान केली.

यामुळे भांबावलेल्या व भेदरलेल्या अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराबाहेर एकच गर्दी केली. थकीत बिलापोटी पोलीस विभागावार कारवाई केल्यानंतर अशा पद्धतीने गृह अर्थात पोलीस विभाग सूड घेत असेल, तर कायदा कुठे आहे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला तर दुसरीकडे या सर्व अफवा असून अशा पद्धतीच्या मोहिमा आम्ही अनेक विभागात नेहमी राबवितो, असा पवित्रा पोलीस विभागाने घेतला आहे. पोलिसांनी एखाद्या गुंडासारखी भूमिका घेतल्यानंतर घाबरलेल्या महावितरणने कापलेले एकमेव कनेक्शन पुन्हा जोडून दिले.

यात थकीत बिल भरलेच गेलेले नाही हे विशेष. आता वीज कनेक्शन कापण्याच्या दिवशीच पोलिसांनी महावितरणच्या कार्यालयापुढे चलान मोहीम का राबवली, यातच सर्व आले. दोन्ही विभाग अत्यावश्यक सेवा गटात मोडतात. थकीत वीज बिल असताना अशा पद्धतीने सुडाची कारवाई करण्याइतपत मग्रुरी पोलिसांमध्ये येतेच कुठून, असाही प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT