election 2022 voting begins
election 2022 voting begins saam tv
महाराष्ट्र

Election 2022: चंद्रपूर, नगर, नांदेड, गडचिराेलीसह रायगडात मतदार पडले घराबाहेर; नेत्यांची प्रतिष्ठापणास

सचिन आगरवाल, संजय तुमराम, संतोष जोशी, गोविंद साळुंके

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या २० जागांसाठी आज मतदान हाेत आहे. एकूण ६८ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही- पोंभूर्णा- गोंडपिंपरी -कोरपना- जिवती -सावली या नगर पंचायतीत ही निवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात इथली प्रक्रिया थांबवली होती. ओबीसींसाठी (obc reservation) राखीव असलेल्या या जागा आता सर्वसाधारण गटातून भरत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक (nagar panchayat election) प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. उद्या (बुधवार) सर्वच जागांची मतमोजणी त्या-त्या नगरपंचायतीच्या मुख्यालयात होणार आहे. (chandrapur gadchiroli nagar nanded nagar panchayat election 2022 voting begins)

अकोलेत मतदान सुरु

अकोले नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी आज मतदान होत आहे. आरोप-प्रत्यारोप व राजकीय उकळ्या पाखळ्यांमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अकोले नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ प्रभागातील निवडणुकीचे मतदान झाले. यावेळी राहिलेल्या चार जागा ओबीसी आरक्षित होत्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या चार जागांचे ओबीसी आरक्षण रद्द होऊन सर्वसाधारणमधून निवडणूक आज होत आहे. ही निवडणूक माजी मंत्री मधुकर पिचड आणि आमदार किरण लहामटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

नगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायत येथील प्रत्येकी ४ जागांसाठी मतदान सुरू आहे. कर्जत तसेच पारनेर तालुक्यातील नगर पंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत पारनेर ला १७.८५ टक्के तर कर्जत ला १३.८३ टक्के इतके मतदान झाले आहे. कर्जत नगर पंचायत ही भाजपचे माजी आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठेची आहे.

पारनेर नगर पंचायत ही सेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी प्रतिष्ठेची केली आहे. सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या मतदानाचा उत्साह पहिल्या नंतर उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड जिल्ह्यात मतदानास प्रारंभ

नांदेड जिल्ह्य़ातील तीन नगरपंचायतींच्या अकरा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी साडेसात वाजल्या पासून मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल होत आहेत. नायगाव नगरपंचायतीसाठी तीन, माहूरसाठी चार तर अर्धापूरसाठी चार जागांवर निवडणुक होत आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. उद्या मतमोजणी होणार असून मतदार राजाने कुणाच्या बाजूने कौल दिला हे निकालानंतरच कळेल.

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या ११ जागांसाठी आज मतदानास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सिरोंचा- मूलचेरा- अहेरी -कुरखेडा- धानोरा -चामोर्शी या नगरपंचायतीत ही निवडणूक होत आहे.

रायगडात १४.६६ टक्के मतदान

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या अनारक्षित झालेल्या २१ जागेसाठी सकाळी नऊ वाजेपर्यत 14.66 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आतापर्यत १४७० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात शांततेत मतदान सुरू आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त निवडणुकीच्या अनुषंगाने ठेवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT