Rajura court firing incident latest update saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

Chandrapur Firing In Front Court : राजुरा तालुका न्यायालयासमोरील परिसरात तरुणावर गोळीबार करण्यात आला. विनोद उर्फ पापा जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांना शरण आले असून तपास सुरू आहे.

Bharat Jadhav

  • राजुरा तालुका न्यायालयासमोरच गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली.

  • नारळपाणी दुकानाजवळ बसलेल्या विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर दोन तरुणांनी गोळीबार केला.

  • डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्याने जाधव गंभीर जखमी झाले

संजय तुकराम, साम प्रतिनिधी

राजुरा तालुका न्यायालयासमोरील परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली. नारळपाणी विक्रीच्या दुकानाजवळ बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धाड-धाड गोळ्या झाडल्या. विनोद उर्फ पापा जाधव असं गोळीबारात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी समोरून गोळीबार केला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले.

गोळीबारात डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्याने जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी . प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान, या हत्येतील आरोपी करण मेकलवार (वय 22) आणि करण दीपक बावीसकर (वय 24) यांनी स्वतःहून राजुरा पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली.

पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे. हा हल्ला कशासाठी केला गेला, याचे कारण अजून समोर आलेले नाही. पापा जाधव हे सोमनाथपूर येथील रहिवासी होते. दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्य, व्यावसायिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

राजुरा शहरात यापूर्वीही गोळीबाराच्या गंभीर घटना घडल्या असून, अशा घटनांमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. न्यायालयासमोरील गजबजलेल्या परिसरातच गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही गंभीर बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

भंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात निष्पापांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT