Chandrapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur Crime News: एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय मुलीवर टाकलं पेट्रोल अन्...; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Petrol Thrown on 14 Year Old Girl: प्रेमाला नकार दिल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १९ वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकलं आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur News: मीरा रोडमधील तरुणीच्या हत्येची घटना ताजी असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर नराधमाने पेट्रोल टाकलं आहे. या घटनेत तरुणी थोडक्यात बचावली आहे. पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली असून आरोपीच्या मुसक्या आवळ्यात. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात प्रेमाला नकार दिल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १९ वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकलं आहे. मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने तेथून पळ काढला. भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे सोमवारी संध्याकाळी ही घटना उडली आहे.  

पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून पेट्रोल (Petrol) टाकले. मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिद्धांत या तरुणावर काल रात्री जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा (३०७) गुन्हा दाखल करत अटक केली आहे. आरोपी देखील बेलगावचाच रहिवासी असून आयटीआयचा विद्यार्थी आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीचा पाठलाग करत होता. त्याला तरुणी आवडत असल्याचे त्याने तिला सांगितले. मात्र तरुणीने त्याला नकार दिला होता. तरुणीने नकार दिल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यामुळे आरोपीने तिच्या घरावर पाळत ठेवली. सोमवारी तरुणीचे कुटुंबीय बाहेर गेले होते. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून नराधमाने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Suraj Chavan : सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

Gratuity Rules: नोकरी सोडताय? थांबा, त्यापूर्वी ग्रॅच्युटीचे हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

SCROLL FOR NEXT