Chandrapur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Accident News: हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला; दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीसह लेकीचा जागीच मृत्यू

चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथे पेट्रोलपंपाजवळ भीषण अपघात झाला आहे.

Vishal Gangurde

Chandrapur Accident News: चंद्रपुरात अपघाताची मोठं वृत्त हाती आलं आहे. चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथे पेट्रोलपंपाजवळ भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपुरात भीषण अपघात झाला आहे. चंद्रपुरातील राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. दुचाकीवर तीन जणांचं कुटुंब निघालं होतं. दुचाकीवर प्रवास करणारे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात पती-पत्नी यांच्यासह लेकीचा मृत्यू झाला आहे. नीलेश वैद्य, त्याची पत्नी रुपाली आणि ३ वर्षांची मुलगी मधू यांचा जागीत मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर राजुरा पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहेत.

बसच्या चाकाखाली सापडून सातवीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, साताऱ्यात एका शालेय विद्यार्थिनीचा बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या विचित्र अपघातामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. साताऱ्यातील वाई बसस्थानावकर ही अपघाताची घटना घडली.

काल दुपारच्या सुमारास वाई बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. यामध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींची लक्षणीय संख्या होती. सलग सुट्ट्यांमुळे अनेक प्रवासी देखील महाबळेश्वर, पाचगणीला जाण्यासाठी वाईतील बसस्थानकावर दिसून येत होते. यावेळी बसस्थानकावर काल दुपारच्या सुमारास एक दुर्देवी घटना घडली. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीचा एसटीच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. या घटनेनंतर बसस्थानकावर एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT