Chandrapur Accident Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur Accident: भीषण अपघात! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला; ४ जणांचा जागीच मृत्यू

Chandrapur Truck Overturns On Rickshaw: शहरातील बल्लारपूर बायपास जवळ रिक्षा- आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (Accident) झाला.

संजय तुमराम

Chandrapur Accident News:

बाप्पाच्या निरोपाची तयारी सुरू असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. काल (बुधवार) अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपासवर हा भीषण अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर (Chandrapur) शहरातील बल्लारपूर बायपास जवळ रिक्षा- आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. अनियंत्रित झालेला ट्रक थेट रिक्षावर उलटल्याने ही मोठी दुर्घटना घडली. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

हा भरधाव ट्रक अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन येत होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट शेजारून निघालेल्या रिक्षावर उलटला. रिक्षामध्ये बसलेल्या चौघांचा चिरडुन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

KL Rahul: 358 रन्स करूनही भारताच्या पदरी पराभवच; 'या' खेळाडूंवर केएल राहुलने फोडलं खापर, म्हणाला, मी स्वतःला दोष देतोय कारण...!

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

SCROLL FOR NEXT