Chandrakant Patil Vs Uddhav thackeray Saam TV
महाराष्ट्र

"शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल"?

संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला चांगलच घेरलं आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून (Rajyasabha Election) माघार घेतली आहे. आज मुंबईत पत्रकारपरिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला चांगलच घेरलं आहे. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? असं ट्विट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. (Chandrakant Patil Latest News)

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते शिवसेनेच्या पाठींब्याने राज्यसभा निवडणुक लढवणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेनं राज्यसभेसाठी सहावा उमेदवार दिल्याने संभाजीराजेंची कोंडी झाली. त्यानंतर संभाजीराजे राज्यसभा निवडणुक लढणार की माघार घेणार की अपक्ष लढणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आज संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. "शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावं मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात 'शिव' वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव..." अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे

इतकंच नाही तर, "राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं"? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

संभाजीराजे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री यांचे स्नेही भेटायला आले होते, त्यांनी मला आज ही इच्छा आहे शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा असे सांगितले, मी नकार दिला. शब्द मला मिळाला म्हणून मी कोल्हापूरला गेलो. मला कागदपत्रं पूर्ण करायची होती म्हणून मी कोल्हापूरला गेलो. तेवढ्यात शिवनसेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेचा अर्ज भरला. मी खासदार, मंत्री यांना मी फोन केला. हा काय प्रकार सुरू आहे. शिवसेनेने माझ्या जागी एकाला उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्री यांनी शब्द पळाला नाही असा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT