मोठी बातमी! अखेर संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार

मी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोकळा झालो असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Sambhajiraje Chhatrapati News
Sambhajiraje Chhatrapati NewsSAAM TV
Published On

मुंबई : शिवसेनेनं राज्यसभेसाठी (Rajya Sabha) सहावा उमेदवार दिल्यानंतर संभाजीराजेंची (Sambhaji Raje Chhatrapati) कोंडी झाली होती. त्यानंतर संभाजीराजे राज्यसभा निवडणुक लढणार की माघार घेणार की अपक्ष लढणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आज संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोकळा झालो असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत पत्रकारपरिषद घेत त्यांनी ही घोषणा केली आहे. (Sambhaji Raje Chhatrapati Latest Marathi News)

Sambhajiraje Chhatrapati News
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

काय म्हणाले संभाजीराजे?

"सर्वप्रथम सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी केलं हे मी कदापी विसरु शकत नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय दिशा कशी असणार याबाबत 12 मे रोजी पुण्यात दोन निर्णय जाहीर घेतले. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार. पुण्यातील पत्रकारांनी पीसी ऐकल्यावर मला विचारलं हा भाबडेपणा नाहीये का? मी म्हटलं हो. मला सर्व गणितं माहिती आहेत. पुढील प्रवास किती खडतर आहे. मला सर्व पहायचं होतं. सर्व अनुभवायचं होतं. गेली 15 ते 20 वर्षे नवीन राजवाडा सोडून मी कम करत आहे. राज्यभर फिरतोय. प्रामाणिकपणे भूमिका मांडत होतो. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असं वाटत होतं". असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

पुढे बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहील. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार. शिवसेनेने मला ऑफर दिली आणि पक्षात प्रवेश करण्याची खासदारकी मिळवा. मी घेऊ शकलो असतो पण मी जाहीर केलं होतं की, मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत. राजे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडे बाजार होणार त्यामुळे मी उमेदवारी भऱणार नाही. असं म्हणत त्यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com