Chandrakant Patil On Rahul Gandhi Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari: राहुल गांधींना उशिरा सुचलेलं शहाणपण, आषाढी वारीवरून चंद्रकांत पाटील यांचा टोला

Chandrakant Patil On Rahul Gandhi: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, राहुल गांधी आषाढी वारीत चालणार असल्याची चर्चा आहे. त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे.

भरत नागणे

राहुल गांधी आषाढी वारीत चालणार असल्याची चर्चा आहे. त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला. आषाढी यात्रा तयारी पाहाणी करण्यासाठी आज चंद्रकांत पाटील पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड येथील दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधला. वारीतील सुविधांबाबत चर्चा आणि सुचना ऐकून घेतल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधीच्या वारीतील सहभागावर बोलताना मंत्री पाटील यांनी टिका केली.

ते म्हणाले, यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून 17 ते 18 लाख भाविकेतील असा अंदाज आहे. या दृष्टीने प्रशासनाने वारीची तयारी केली आहे. वारीमध्ये वारकऱ्यांना पाणी आरोग्य दिवाबत्ती आधी मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

यात्रेच्या पूर्वीची तयारी पाहणी करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यानुसार आज यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. प्रशासनाने समाधानकारक तयारी केली आहे. यात्रा काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास किंवा उणीव भासू दिली जाणार नसल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार असल्याचे माध्यमातून माहिती मिळाली आहे विठुरायाचे दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार आहे वयोमानानुसार प्रत्येकाला धार्मिक क्षेत्राची ओढ लागते तशीच ओढ राहुल गांधीना देखील लागली आहे. त्यांना ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT