काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा समाचार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. खासदार प्रणिती शिंदे यांचा उल्लेख करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीसांकडे पंतप्रधान होण्याचे गुण आहेत. पण त्याबाबत आमचा पक्ष ठरवेल, अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बाणेर बालेवाडी येथील भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पॅनकार्ड रोड येथे मिशन निर्मल स्वच्छता अभियानचे आयोजन केले होते. त्या अभियानचे भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'देवेंद्र फडणवीसांमध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आणि गुण आहेत.त्यांच्याकडे रात्रंदिवस काम करण्याचं व्हिजन आहे. आमचा पक्ष ठरवेल. देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान व्हायचं का नाही, पण त्यांच्याकडे ते गुण आहेत'.
'हर्षवर्धन सपकाळ कालपर्यंत तुम्ही पडलेले आमदार होतात. राज्याचे अध्यक्ष झाल्यावर इतके बोलू नका. वेल कल्चरल, खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या परंपरेमधले आहेत. असं एकदम नका बोलू, त्याकडे देवेंद्र फडणवीस दाबून ठेवतात म्हणून बरे. आम्हाला पण बोलता येतं. देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलला तर आम्हाला पण अंगावर जावे लागेल. खासदार प्रणिती शिंदे यांनीही नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काळा दिवस म्हटलं. कुठे चालली आपली संस्कृती, असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
'गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचं माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे, सदाभाऊ खोत यांच्यासह कोणत्याही नेत्यांनी समर्थन केलेल नाही. त्या विधानानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी,त्यांची आई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि त्यांची मुलगी या सर्वावर तुम्ही बोलता. तुम्हाला हे चालत का? त्यावेळी तुम्ही रस्त्यावर का उतरला नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.
'मी गोपीचंद पडळकर यांचं समर्थन करीत नाही. त्यांनी ती भाषा वापरु नये. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. गोपीचंद हा आमचा अज्ञानधारक कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांमुळे उद्यापासून गोपीचंद पडळकर यांच्या देहबोली आणि भाषेमध्ये फरक दिसेल. तसेच आता यापुढील काळात अशी कोणीच भाषा वापरु नये, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.