Chandrakant Patil on Ajit Pawar संभाजी थोरात
महाराष्ट्र

सरकारच्या चाव्या फक्त अजितदादांकडेच - चंद्रकांत पाटील

राज्यात पोलीस प्रशासनाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचे काम सुरु आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर - अजित पवार यांनी काल पुरंदर तालुक्यातील एक कार्यक्रमात बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत, परंतु त्यांना कुठं माहिती आहे की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार... असे वक्तव्य केले होते त्यांच्या याच वक्तव्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीच चालवत आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना, आमदारांना फक्त गाड्याच फिरवायच्या आहे. अजित दादा खरच बोलले त्यांच्याकडेच चाव्या आहेत असा खोचक टोमणा पाटलांनी यावेळी मारला आहे.

हे देखील पहा -

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिला नाही. पोलीस प्रशासनाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचे काम सुरु आहे. काल सांगली मध्ये सुद्धा अहिल्याबाई होळकर यांचे समरक जे भाजपच्या नगरसेवकाने पूर्ण केले त्याच उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करणार आणि भाजपच्या लोकांना बोलावणर नाही अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती. म्हूणन आम्ही कलाच उद्घाटन करून ठेवले आहे. महाविकास आघाडीची अनेक बाबतीत दडपशाही सुरु असे देखील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर देखील आपले मत व्यक्त केले. कर्मचाऱ्यांनी संप करू नये म्हणून एसटी,वीज कर्मचाऱ्यांचे बाबतीमध्ये दडपशाही सुरू आहे. हे चुकीचा आहे. लोकशाही मध्ये मागण्या मान्य करून घेण्याचा अधिकार आहे अशी बंधने घालण्याची वेळ का येते याचा विचार सरकारने करावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपाच्या सत्यजित कदम यांना कोल्हापूर उत्तरसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदीच विराजमान झाले आहेत. त्यामुळे विकासाच्या कामावर सत्यजित कदम विजयी होती असे देखील पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT