CHANDRAKANT PATIL CONTROVERSIAL STATEMENT SPARKS POLITICAL ROW IN MAHARASHTRA saam tv
महाराष्ट्र

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

Opposition Slams Chandrakant Patil Over Controversial Protest Remark: राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सध्या त्यांच्या अजब गजब दाव्यांमुळे चर्चेत आहेत. गेल्या 8 दिवसात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानामुळे आता त्यांची थेट नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करा, अशी मागणी एका खासदारानं केलीय... नेमकं प्रकरण काय आहे..चंद्रकांत पाटील कोणत्या विधानाने चर्चेत आले? पाहूयात या रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

उच्च होय... उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या त्यांच्या उच्च दर्जाच्या दाव्यांमुळे आणि तितक्याच अजब तंत्रांमुळे जबरदस्त चर्चेत आलेत, सीजेपीच्या आंदोलनानंतर रामदेव बाबा आणि कंगना रणौत यांनी आंदोलकांना लक्ष्य करण्याची जणू स्पर्धाच लावली होती. पण आता आपल्या चंद्रकांत पाटलांनी असा काही नवा शोध लावलाय, ज्याने कंगना आणि रामदेव बाबांनाही मैलोन् मैल मागे टाकलंय. नक्की काय म्हणालेत चंद्रकांत पाटील आणि त्यांनी असा कोणता दावा केलाय? पाहा हा रिपोर्ट...

आंदोलकांवर सध्या पोलिस कारवाई सुरु झालीये. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीनं सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं आंदोलकांवर कुठलीही कारवाई करणार नसल्याचं जाहिर केलं. असं असताना, आता चंद्रकांत पाटलांच्या या नव्या शोधामुळे दिल्ली पोलिसांसमोरही भलताच यक्षप्रश्न निर्माण होण्याची शक्यताये. कारण नेमके किती ट्रक दगड जमा झाले, याचं उत्तर आता दिल्ली पोलिसांनाच द्यावं लागणार आहे. मात्र चंद्रकांत पाटलांच्या या अजब दाव्याचा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत काय सांगितलं ते ऐका..

विशेष म्हणजे, अवघ्या सात दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांनी पेपरफुटीच्या संवेदनशील मुद्द्यावर असंच एक अजब विधान करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती.चंद्रकांत पाटील आणि त्यांची वादग्रस्त विधानं यांचं जुनं नातं आहे. याआधीही त्यांच्या अनेक विधानांवरून राजकीय गदारोळ झालाय. मात्र यावेळी त्यांनी गहजब माजवणारं अजब विधान केल्यामुळे

पोलीसही नक्कीच बुचकळ्यात पडले असतील एवढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

Fennel Seeds : कच्ची की भाजलेली बडीशेप? आरोग्यासाठी कोणती अधिक योग्य?

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT