Chandrakant Khaire's appeal to Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

'मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना भावनिक आवाहन

'आम्ही पाहिले आहे उद्धव ठाकरेंनी, तुम्ही किती काम केले तसेच आपण ठाकरे आहात आणि लोक ठाकरे परिवाराला मानतात.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्याच्या कामाचे नाहीत असं वक्तव्य केलं होतं. राज यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज ठाकरेंना भावनिक आवाहन केलं आहे.

खैरे म्हणाले, 'मी राज ठाकरेंना हात जोडून विनंती आहे, मोठ्या भावाबद्दल असे काही बोलू नका, तसेच आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे असा सल्ला देखील चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंना दिला. आम्ही पाहिले आहे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तुम्ही किती काम केले तसेच आपण ठाकरे आहात आणि लोक ठाकरे परिवाराला मानतात' असे देखील चंद्रकांत खैरे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे ?

काल वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राज ठाकरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलतात वेगळं आणि आणि करतात वेगळं त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काही नाही. शिवाय उद्धव यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला जेवढं माहिती नाही तेवढ्य़ा जवळून मला माहिती असल्याचं ते म्हणाले.

तसंच यावेळी त्यांनी शिवसेना फुटण्याचं कारण ही पुत्रप्रेमचं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली सेना फुटीला दुसरं कोणतंच कारण नसल्याचंही राज कालच्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : दिवसभरात प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांचा आनंद गगनात मावणार नाही

Vande Bharat Sleeper: 'या' दिवशी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

दादांना घातला थेट क्रेनला लटकून हार; पिंपरीत कार्यकर्त्याचा भन्नाट स्टंट, नेत्याला इम्प्रेस करण्यासाठी काय पण

Aawaj Maharashtra Pune: 'निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंट झाल्या, आश्वासनांपलीकडे विकास हवा'

SCROLL FOR NEXT