Mid Day Meal , jalna , police, chandanzira
Mid Day Meal , jalna , police, chandanzira saam tv
महाराष्ट्र

पोलिसांची मोठी कारवाई; ८१० पोती शालेय पोषण आहार जप्त, नामांकित संस्था संशयाच्या भाेव-यात

लक्ष्मण सोळुंके

जालना : शालेय पोषण आहार (mid day meal) काळ्या बाजारात घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या एका वाहनाचा पाठलाग करुन तसेच गाेदामात छापा टाकून पाेलिसांनी (police) ८१० पोती शालेय पोषण आहार जप्त केला आहे. हा पाेषण आहार एका नामांकित संस्थेचा असल्याची माहिती समाेर आली आहे. या प्रकरणाचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

चंदणझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या काही इसम विद्यार्थ्यांसाठी शाळेत वितरित केला जाणारा शालेय पोषण आहार काळ्या बाजारात घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चंदणझिरा पोलिस ठाण्याच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश झलवार, शिवाजी पोहार यांच्या पथकानं पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सोरटीनगर परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास सापळा रचला.

यावेळी एक सहा चाकी वाहन आले. त्याचा पाेलिसांनी पाठलाग करत हे वाहन ताब्यात घेतले. तसेच पहाटे पाच पर्यंत परिसरात असलेल्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत पाेलिसांनी तब्बल ८१० पोती शालेय पोषण आहार जप्त केला.

या प्रकरणी चंदणझिरा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या विरुद्ध अवैधरित्या काळ्या बाजारात शालेय पोषण आहार विक्री करण्यास घेऊन जात असल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

दरम्यान पोलिसांकडून एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पोषण आहार एका नामांकित संस्थेचा असल्याने शहरात या कारवाईची माहिती पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT