नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता 
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत पुढीलप्रमाणे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नांदेड : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार ता. 12 ते ता.16 जुलै या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत पुढीलप्रमाणे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.

हेही वाचा - वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे संगोपनाची हमी घेऊन सुरक्षित ठिकाणी वृक्ष भेट देऊन लागवड करून दिली जाते. खडकूत गोशाळेचे कार्याध्यक्ष माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नये. शॉवरखाली अंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाइन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नये. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधवांना घेतलं ताब्यात|VIDEO

गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं

Government Jobs: महाराष्ट्रात लवकरच सरकारी नोकरीची मेगाभरती, फडणवीसांची घोषणा | VIDEO

SCROLL FOR NEXT