Corona Vaccination भारत नागणे
महाराष्ट्र

कोरोनाची लस न घेताच प्रमाणपत्र; लसीकरण मोहिमेतील सावळा गोंधळ उघड

लसीकरण मोहिमे विषयी साशंकता निर्माण झाली आहे.

भारत नागणे

पंढरपूर - कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लस न घेताच एका तरूणाला पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हा धक्कादायक प्रकार माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील गौरव गणेश टिळकर या तरूणाच्या बाबतीत घडला आहे. या प्रकारामुळे लसीकरण मोहिमेतील (Vaccination campaign) सावळा गोंधळ समोर आला आहे. गौरवने 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी काही दिवसांपूर्वी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात लस मिळण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केली होती.

हे देखील पहा -

सध्या 15 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस दिली जाते. गौरव सोलापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. कॉलेजमधील उपस्थितीसाठी लसीकरण बंधनकारक केल्याने त्याने ऑनलाईन नोंदणी केली होती. गौरव काल लस घेण्यासाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात गेला होता. त्यावेळी 18 वर्षे पूर्ण व्हायला आणखी काही महीने बाकी असल्याचे सांगून त्याला कोव्हीशील्ड ही लस कर्मचाऱ्यांनी दिली नाही.

मात्र त्याचे लसीकरण झाल्याची ऑनलाईन नोंद मात्र संगणकावर करण्यात आली. त्यामुळे लस न देताच गौरवला कोरोना प्रतिबंधक कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमे विषयी साशंकता निर्माण झाली आहे. बोगस लसीकरणीची प्रकरणे समोर येत असताना आणखी एक प्रकार समोर आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT