लसीकरणाचा सावळा गोंधळ ; लस घेतली नसतानाही नागरिकांना प्रमाणपत्र ! SaamTv
महाराष्ट्र

लसीकरणाचा सावळा गोंधळ ; लस घेतली नसतानाही नागरिकांना प्रमाणपत्र !

एकीकडे मोठय़ा प्रमाणावर लसटंचाई असताना दुसरीकडे नागरिकांना तांत्रिक गोंधळाचा सामना करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

वसई-विरार : एकीकडे मोठय़ा प्रमाणावर लसटंचाई असताना दुसरीकडे नागरिकांना तांत्रिक गोंधळाचा सामना करावा लागत आहे. लशीची पहिली मात्रा घेतली तरी दुसरी मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र थेट नागरिकांना मिळू लागले असल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरारमध्ये राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेला २८ जून रोजी दुसरी मात्रा घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला आणि वसई अग्रवाल केंद्रातून दुसरी लस घेतल्याचे प्रमाणपत्रही मिळाले. Certificate to citizens even without vaccination!

हे देखील पहा -

लस घेतली नसताना दुसरी लस दिल्याचे खोटे प्रमाणपत्र आले आहे. मग आता दुसरी लस घ्यायची कशी? असा सवाल त्या महिलेने उपस्थित केला आहे. असाच प्रकार नालासोपारामध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला आहे. या तरुणाला देखील दुसरी लस मिळालेली नसताना दुसरी लस घेतल्याचा मेसेज आणि प्रमाणपत्र मिळाले आहे.

या गोष्टी ची विचारणा जेव्हा महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा वाळके यांच्याशी केली असता, पालिकेने मात्र उपयोजन (अ‍ॅप) मधील तांत्रिक दोषामुळे असा घोळ होत असल्याचे सांगितले आहे. ८४ दिवस पूर्ण झाल्याने आपोआप उपयोजनमधून असा मेसेज जात असावा असे सांगितले. मात्र नागरिकांना लस दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

SCROLL FOR NEXT