केंद्राची 'जल जीवन योजना' यशस्वी होणार? राज्यमंत्री तनपुरेंचा संशय दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

केंद्राची 'जल जीवन योजना' यशस्वी होणार? राज्यमंत्री तनपुरेंचा संशय

आता जल जीवन योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. ही योजना सुध्दा तशी होणार काय असा संशय नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी व्यक्त केला आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर: केंद्रात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर 2022 पर्यत सर्व गरिबांना घरे देणार अशी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली, यानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली पण 2019 मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या दीड लाख रुपयांचे अनुदान अद्यापही केंद्राने दिले नाही. आता जल जीवन योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. ही योजना सुध्दा तशी होणार काय असा संशय नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी व्यक्त केला आहे. ते लातूर जिल्ह्यातील औसा इथं शिवकालीन मराठा भवनाच्या पायाभरणी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

लातूर जिल्ह्यातील (Latur District) औसा इथं नगर पालिकेच्या वतीने निर्माण होत असलेल्या शिवकालीन मराठा भवनाचे पायाभरणी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या भवनात छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आणि वाचनालय निर्माण करण्यात येणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष अफसर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड श्रीकांत सूर्यवंशी, संतोष सोमवंशी, सुनील नावाडे, जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र शासनाने (Central Government) गोरगरीब नागरिकांना 2022 पर्यत घरे उपलब्ध करून देण्याच जाहीर केलं. राज्यातील विविध शहरातील नागरिकांना या योजनेत निवड केली. यासंबंधी राज्य शासनाने प्रती लाभार्थी एक लाख रुपये दिले पण केंद्राचा दीड लाखांचा वाटा दिला नाही. यासाठी राज्य सरकारला किमान 10 हजार कोटी यायला हवं होतं पण केवळ 700 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आता जल जीवन योजना अर्थात प्रत्येक घराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी योजना घोषित केली आहे. सर्वाना घर या योजने प्रमाणे जल जीवन मिशन अयशस्वी होऊ नये असं हल्लाबोल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केंद्र सरकार वर करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT