केंद्रीय पथकाने केली अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने केली अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

राज्य सरकारने अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. त्यानुसार आज अलिबाग येथे सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आयसीएमआरचे केंद्रीय पथक दाखल झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

अलिबाग : राज्य सरकारने अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी  केंद्राकडे पाठविला आहे. त्यानुसार आज अलिबाग येथे सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आयसीएमआरचे तीन जणांचे दोन केंद्रीय पथक दाखल झाले आहे. एका पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत पाहणी केली. जिल्हा सामान्य रुगणालायत ओपीडी, अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयू, मेडिकल वार्ड, सर्जिकल वार्ड, प्रयोगशाळा, औषध भांडार, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय इमारत याची एका पथकाने पाहणी केली.

हे देखील पहा -

तर दुसरे पथकाने आरसीएफ येथे तात्पुरते तयार करण्यात आलेले लेक्चर रूम, हॉस्टेल, वैद्यकीय अधिकारी निवासस्थान आणि इतर मेडिकल फ़ॅकल्टी इमारतीची पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यानंतर अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राकडून यावर्षात मंजुरी मिळणार का याकडे आता रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

अलिबाग तालुक्यातील उसर याठिकाणी 52 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाने मंजूर केली आहे. राज्य शासनाने महाविद्यालयासाठी 406 कोटी निधीही मंजूर केलेला आहे. राज्य सरकारने अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. उसर येथे शासकीय महाविद्यालयाचे काम सुरू झाले नसले तरी तात्पुरते जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयाच्या अनुषंगाने लागणारे स्ट्रक्चर उभारले जात आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजची पहिली बॅच यावर्षात सुरू करण्याचा पालकमंत्री अदिती तटकरे याचा मानस आहे. अद्याप केंद्राची परवानगी मिळालेली नाही. मात्र केंद्रीय पथक अलिबागमध्ये पाहणी साठी दाखल झाल्याने लवकरच ही परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी जेजे रुग्णालयाचे डॉक्टर, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.गिरीश ठाकूर यांनी पथकाला माहिती दिली. रायगडात वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी इच्छा अनेक वर्षे रायगडकरांची होती. त्यादृष्टीने आता पावले उचलली जात असल्याने केंद्राची मंजुरी मिळाल्यास लवकरच रायगडकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास रायगडकरांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार आहेत. उपचारासाठी मुंबई, पुण्याकडे जाण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT