Ganapati Special Train x
महाराष्ट्र

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

Ganeshotsav Special Train : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वे २५० विशेष गणपती गाड्या चालवणार आहे.

Yash Shirke

Ganapati Special Trains 2025 : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे. श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे २५० गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. चला या २५० गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाणून घेऊयात...

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष ट्रेन (४० सेवा)

01151 विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ दरम्यान दररोज ००.२० वाजता सुटेल (२० सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.२० वाजता पोहोचेल.

01152 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ दरम्यान दररोज १५.३५ वाजता सुटेल (२० सेवा) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे , आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)

01103 विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ दरम्यान दररोज १५.३० वाजता सुटेल (१८ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल.

01104 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २३.०८.२०२५ ते ०९.०९.२०२५ दरम्यान दररोज ०४.३५ वाजता सुटेल (१८ सेवा) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १६.४० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅ

३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रत्नागिरी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)

01153 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ दरम्यान दररोज ११.३० वाजता सुटेल (१८ सेवा) आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी २०.१० वाजता पोहोचेल.

01154 विशेष ट्रेन रत्नागिरी येथून दि. २३.०८.२०२५ ते ०९.०९.२०२५ दरम्यान दररोज ०४.०० वाजता सुटेल (१८ सेवा) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष ट्रेन (३६ सेवा)

01167 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ दरम्यान २१.०० वाजता दररोज सुटेल (१८ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.२० वाजता पोहोचेल.

01168 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २३.०८.२०२५ ते ०९.०९.२०२५ दरम्यान दररोज ११.३५ वाजता सुटेल (१८ सेवा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.

५) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष ट्रेन – ३६ सेवा

01171 विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसहून दि. २२ ऑगस्ट २०२५ ते ०८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ०८.२० वाजता दररोज सुटेल (एकूण १८ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता पोहोचेल.

01172 विशेष ट्रेन सावंतवाडी रोड येथून दि. २२ ऑगस्ट २०२५ ते ०८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत दररोज २२.३५ वाजता सुटेल (एकूण १८ फेऱ्या) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन.

६) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक विशेष ट्रेन) – ६ सेवा

01129 साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५, ०२ सप्टेंबर २०२५ आणि ०९ सप्टेंबर २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल (एकूण ३ सेवा) आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता पोहोचेल.

01130 साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५, ०२ सप्टेंबर २०२५ आणि ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल (एकूण ३ सेवा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आड वली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान वर्ग, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन.

७) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक विशेष ट्रेन) – ४ सेवा

01185 साप्ताहिक विशेष ट्रेन बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ आणि ०३ सप्टेंबर २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल (२ सेवा) आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पोहोचेल.

01186 साप्ताहिक विशेष ट्रेन दि. बुधवार २७ ऑगस्ट २०२५ आणि ०३ सप्टेंबर २०२५ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.३० वाजता सुटेल (२ सेवा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवी आणि करमळी.

संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर कार, २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ पॅंट्री कार (लॉक केलेली स्थिती).

८) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस (वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन) – ६ सेवा

01165 वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन दि. मंगळवारी २६ ऑगस्ट २०२५, ०२ सप्टेंबर २०२५ आणि ०९ सप्टेंबर २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल (३ सेवा) आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पोहोचेल.

01166 वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून प्रत्येक मंगळवारी २६ ऑगस्ट २०२५, ०२ सप्टेंबर २०२५ आणि ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी १६.३० वाजता सुटेल (३ सेवा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.५० वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवी आणि करमळी.

संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, दोन जनरेटर कार आणि एक पॅंट्री कार (लॉक केलेली स्थिती).

९) पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेष ट्रेन (६ सेवा)

01447 साप्ताहिक विशेष ट्रेन शनिवार दिनांक २३.०८.२०२५, ३०.०८.२०२५ व ०६.०९.२०२५ रोजी पुणे येथून ००.२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.

01448 साप्ताहिक विशेष ट्रेन शनिवार दिनांक २३.०८.२०२५, ३०.०८.२०२५ व ०६.०९.२०२५ रोजी रत्नागिरी येथून १७.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.

थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आडवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.

१०) पुणे – रत्नागिरी वातानुकुलित साप्ताहिक विशेष ट्रेन (६ सेवा)

01445 वातानुकुलित साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार, दिनांक २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ व ०९.०९.२०२५ रोजी पुणे येथून ००.२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.

01446 वातानुकुलित साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार, दिनांक २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ व ०९.०९.२०२५ रोजी रत्नागिरी येथून १७.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना: ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

११) दिवा – चिपळूण – दिवा मेमू (MEMU) दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३८ सेवा)

01155 मेमू विशेष गाडी दिनांक २३.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ दरम्यान दिवा येथून दररोज ०७.१५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

01156 मेमू विशेष गाडी दिनांक २३.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ दरम्यान चिपळूण येथून दररोज १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जीते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विंहेरे, दिवाणखवटी, कळबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी.

संरचना: ८ डब्यांच्या मेमू रेक्स.

आरक्षण :

गणपती विशेष गाड्या 01151, 01152, 01153, 01154, 01103, 01104, 01167, 01168, 01171, 01172, 01129, 01130, 01185, 01186, 01165, 01166, 01447, 01448, 01445 आणि 01446 यांचे आरक्षण दिनांक २४.०७.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरु होईल. अनारक्षित कोचसाठी तिकीट बुकिंग अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) द्वारे सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार करता येईल. तपशीलवार थांब्यांची वेळ जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाऊनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT