Central Railway launches two weekly trains between Mumbai and Nanded saam tv
महाराष्ट्र

मुंबई-नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू, कुठे-कुठे असणार थांबा?

Mumbai-Nanded Train: मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहिब नांदेड दरम्यान दोन नियमित साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू केल्या आहेत. या नवीन गाड्यांमुळे दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • दोन नवीन साप्ताहिक रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या.

  • ६ जुलै २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले.

  • या सेवेमुळे मुंबई आणि नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी आहे.तुम्ही वारंवार नांदेडहून मुंबई असा प्रवास करता. व्यवसायासाठी तुमचं नेहमी नांदेड किंवा मुंबईला जाता, तर तुमच्यासाठी ही बामती कामाची आहे. मध्य रेल्वेने दोन रेल्वे गाड्या साप्तहिकपणे चालवल्या जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेडदरम्यान नियमितपणे चालणाऱ्या २ साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. दिनांक ६ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या दोन गाड्यांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेसची नियमित सेवा खालीलप्रमाणे सुरू होईल:

* गाडी क्रमांक 17667 हुजूर साहेब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक ०८.०७.२०२६ पासून

* गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक ०९.०७.२०२६ पासून

* गाडी क्रमांक 17665 हुजूर साहेब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक १३.०७.२०२६ पासून आणि

* गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक १४.०७.२०२६ पासून सुरू होईल.

नियमित फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

(अ) गाडी क्रमांक 17668 / 17667 लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) साप्ताहिक एक्सप्रेस:

गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक ०९.०७.२०२६ पासून दर गुरुवारी १६.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 17667 नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक ०८.०७.२०२६ पासून दर बुधवारी २१.१५ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

या गाड्यांना कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबे देण्यात येतील. गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 14 जुलै 2026 पासून दर मंगळवारी 16.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी 9.10 वाजता पोहोचेल.

(ब) गाडी क्रमांक 17666 / 17665 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस:

गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १४.०७.२०२६ पासून दर मंगळवारी १६.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा.

दोन्ही गाड्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण: गाडी क्रमांक 17666 आणि गाडी क्रमांक 17668 साठी आरक्षण दिनांक ०८.०७.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! कार अन् दोन रिक्षांची एकमेकांना धडक, भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर

Maharashtra News Live Update: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर

Rain Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, ५ जिल्ह्यांना अलर्ट

Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

Monday Horoscope : ग्रहांची विशेष कृपा! ‘या’ 6 राशींच्या नोकरी-व्यवसायात होईल मोठी प्रगती; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT