अमित शाह Saam Tv
महाराष्ट्र

Amit Shah | छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना - अमित शाह

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झालीये, असं अमित शाह पुण्यात म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झालीये, असं अमित शाह (Amit Shah) पुण्यात म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आज पुण्यात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्टीत स्मारकाचे भूमिपूजन व नवीन इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माननीय केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. Central Minister Amit Shah At Pune Municipal Corporation Program

"मी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीचा संकल्प घेतलाय, याने पुण्याच्या नागरिकांना या दोन्ही महापुरुषांचा संदेश मिळत राहील", असं अणित शाह म्हणाले.

"जेव्हा स्वराज्य शब्द उच्चारण अवघड होते, तेव्हा एका तरुणाने स्वराज्य उभारायचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. शिवाजी महाराजांनी सेन्य निर्माण, नौसेना बनवायचं काम केलं. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केल्यावर त्यांच्या मनात स्वराज्याची ज्वाला किती धगधगती असेल याचा अंदाज येतो. स्वराज्याचं आंदोलन शिवाजी महाराजांनंतरही होत राहीलं", असंही अमित शाह यावेळी म्हणाले.

काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान करायची एकही संधी सोडली नाही - अमित शाह

"आज आंबेडकरांच्या पुतळ्याचंही अनावरण झालंय. पूर्ण आयुष्य अपमान सहन केला. पण, संविधान निर्माण करताना कधी कटुता येऊ दिली नाही. आज जगभरात संविधान किती श्रेष्ठ आहे हे कळतंय. पण काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान करायची एकही संधी सोडली नाही. संविधान दिवस एकदाही साजरा केला जात नव्हता. कारण, आंबेडकरांचा मोठेपणा दिसेल. मोदी संविधान दिवस साजरा करतात तेव्हा काँग्रेस बहिष्कार टाकते. तीच काँग्रेस आज आंबेडकरांबाबत बोलतेय. मोदी हे संविधानाला घेऊनच चालतात" असं म्हणत अमित शाहांना काँग्रेसवर निशाणा साधला.

पुणेकरांना ही मेट्रो लवकर वापरायला मिळेल, अशी आशा करतो - शाह

"मोदींनी पुण्याच्या विकासासाठी बरीच पावलं उचलली आहेत. विमानतळासाठी प्रयत्न केले. पण, काम अडकलंय. पुण्यात मोदींनी मेट्रोचं भुमिपूजन केलंय. मी आशा करतो की पुणेकरांना ही मेट्रो लवकर वापरायला मिळेल", असं अमित शाह म्हणाले.

अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल अमित शहा नगरमध्ये होते. प्रवरानगरमध्ये त्यांनी सहकार परिषदेला संबोधीत केले आहे. आज अमित शहा पुणे दौऱ्यावर आहे. काल रात्रीच अमित शहाचं (Amit Shah) पुण्यामध्ये आगमन झालं आहे. कोथरुड मतदार संघाचे आमदार (MLA) चंद्रकांत पाटील, पुणे मनपाचे महापौर (Mayor) मुरलीधर मोहोळ यांनी अमित शहांचे स्वागत केले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT