Central Railway Train issue : Saam tv
महाराष्ट्र

Central Railway Train issue : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अनेक गाड्या स्थानकावर उभ्या, भरपावसात प्रवाशांचे हाल

Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन खोळंबल्या आहेत. तर काही ट्रेन पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मनमाड : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. या पावसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने अनेक गाड्या मनमाड स्थानकावर उभ्या आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाडया पुणे मार्गे वळविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या कसारा ते आटगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर मातीचा भराव वाहून आला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर मध्य रेल्वेच्या महत्वाच्या मनमाड रेल्वे स्थानकावर बहुतेक गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. त्यामुळे भरपावसात प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. तर रेल्वे ट्रॅवकरील मातीचा भराव काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे.

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने बहुतेक गाड्या इगतपुरीपर्यंत चालवण्यात येत आहेत. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मनमाड-दौंड-पुणे या मार्गे वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

मध्य रेल्वेवरील वाहतूक रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे काही काळ रद्द करण्यात आली होती. मात्र, काही वेळानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात आल्या. आज कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वेकडून ठाणे ते दिवा येथील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

पहाटे ओव्हरहेड लाईनमध्ये झाला होता बिघाड

रविवारी सकाळी मध्यरेल्वेच्या वाशिंद आणि कसारा मार्गादरम्यान लोकल बंद झाल्या होत्या. वाशिंद ते कसारादरम्यान ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मार्गिका बंद झाली होती. तसेच मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर झाड पडल्याच्याही घटना घडल्या होत्या. वाहतूक विस्कळीत झाल्याने सुट्टीनिमित्त आसनगाव, कसाऱ्याला जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT