राजूर गणपती ते पाल फाटा राष्ट्रीय महामार्गास केंद्राकडून 60 कोटींचा निधी लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

राजूर गणपती ते पाल फाटा राष्ट्रीय महामार्गास केंद्राकडून 60 कोटींचा निधी

जालना - औरंगाबाद जिल्ह्यातील पाल राजूर गणपती ते पाल फाटा या पन्नास किमीच्या राष्ट्रीय महामार्गालाला केंद्र सरकार कडून 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जालना - औरंगाबाद जिल्ह्यातील पाल राजूर गणपती ते पाल फाटा या पन्नास कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गालाला केंद्र सरकार कडून 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Central Government sanctioned Rs 60 crore for Rajur Ganpati to Pal Fata National Highway)

हे देखील पहा -

मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणातून राज्याच्या विविध भागातून येत असतात. मात्र औरंगाबाद - राजूर महामार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून राजूर ते पाल फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्याकडून वारंवार या महामार्गाच्या निधीबाबत केंद्र सरकारकडे मागणी केली जात होती.

केंद्र सरकारकडून राजूर ते पाल फाटा या राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. आज या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी आमदार नारायण कुचे, राष्ट्रीय महामार्गाच उपअभियंता चामले, श्रीमती वैद्य, शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत करण्यात आली. लवकरच या महामार्गाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहितीही यावेळी आमदार नारायण कुचे आणि उप अभियंता यांच्याकडून देण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

SCROLL FOR NEXT