मातीच्या ढिगाऱ्याखाली लुप्त झालेली लेणी नगरपरिषदेमुळे सर्वांसमोर! कैलास चौधरी
महाराष्ट्र

मातीच्या ढिगाऱ्याखाली लुप्त झालेली लेणी नगरपरिषदेमुळे सर्वांसमोर!

उस्मानाबाद शहरापासून नागनाथ मंदिराच्या जवळच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लुप्त होत चाललेली लाचुंदा लेणी सापडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. उस्मानाबाद शहराच्या परिसरात अनेक लेण्या सापडलेल्या आहे. या लेण्यांचे संरक्षण म्हणावे तेवढे होत नसून या लेण्याचे संरक्षण करून तेथे पर्यटन स्थळ होण्याची गरज आहे. उस्मानाबाद शहरापासून नागनाथ मंदिराच्या जवळच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लुप्त होत चाललेली लाचुंदा लेणी सापडली आहे. ही लेणी पूर्णपणे माती, दगडांनी झाकून गेली होती.

हे देखील पहा :

उस्मानाबाद नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून या लेणीची सफासफाई केली करून घेतली त्यामुळे ही लेणी प्रकाश झोतात आली आहे. जयराज खोचरे हे जिल्ह्यातील इतिहासाचे मोठे अभ्यासक आहेत. त्यांना या लेणीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की उस्मानाबाद शहरापासून काही अंतरावर तीन लेण्या आहेत. मात्र, या लेणी ची नोंद पुरातत्व खात्याकडे देखील नाही. लेणी पाहायला जाण्यासाठी अडचणीचा मार्ग असल्याने लेणी पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली लेणी लुप्त झाली होती.

हा व्यापारी मार्ग असल्यामुळे 7 व्या ते 8 व्या शतकात ही लेणी खोदण्यात आली होती. दगड चांगला नसल्याने ही लेणी अर्धवट खोदण्यात आली. या लेणीमध्ये रघूनाथ महाराजांनी ध्यानसाधना केली असल्याचे खोचरे यांनी सांगितले. तसेच त्यांची समाधी व पादुका या लेण्यांमध्ये आहेत. रघुनाथ महाराजांनी चक्रीभजन लिहिलेले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT